दिमाखदार दिवाणखाना

>> सुनील देशपाडे, इंटिरियर डिझायनर

आज आपण दिवाणखाना (लिव्हिंग रूम) डिझाइनबद्दल बोलतोय. तसे पाहिले तर ही घरातील अशी खोली आहे जिथे जास्तीत जास्त पाहुणे येतात. एपंदरीत ही खोली आपल्या घराचे प्रथम दर्शन घडवते. त्यामुळे सगळय़ात जास्त लक्षपूर्वक डिझाइन करणे गरजेचे असते.

सगळय़ात पहिल्यांदा दिसते ते आपले सेफ्टी दार व बाहेरील पॅनेलिंग. जर आपल्याला रोमन स्टाइल हवेय तर आपण पॅनल दार किंवा मोल्डिंग वापरून त्या दाराला पियू पेंट करू शकतो व विनियर पण वापरू शकतो. एक प्रसन्न लुक तयार होईल. जर
मॉडर्न व काँटेम्पोरारी लुक देत असू तर लॅमिनेटे, विनियर व पियू करून सुरुवातीलाच आपली डिझाइन ठरवू शकता. तसेच छानशी लोभस नावाची पाटी जी आपल्या स्टाइलवर मॅच होईल, अशी लावावी.

आत आल्यावर चप्पल ठेवण्याचे रॅक (शू रॅक) अवजड वाटणार नाही व एक सुंदर लुक येईल असे असावे. त्यावर आपण डिझायनर आरसा लावू शकतो. एखाद्या वॉलला साजेसा वॉल पेपर किंवा पोस्टर, डिकल्स लावू शकतो. मिरर पॅनेलिंग, डिझायनर फ्रेम्सचाही वापर करू शकतो. त्यावर सुंदर लाइट्स देऊन ती वॉल सुशोभित होऊ शकते.

■ डायनिंग एरियामध्ये छानसे सुबक डायनिंग टेबल, गरजेनुसार चार-सहा माणसांचे ग्लास मार्बल टॉपमध्ये लावून वरून मस्त हँगिंग लाइट द्यावा. आपण ट्रक लाइटचा वापर करून एखादी वॉल डिझाइन केली तर त्या वॉलच्या समोर रील्स किंवा मस्त व्हिडीओ शूट करू शकतो. आजच्या पिढीला ते खूप भावते.

■ सोफा आपल्या लिव्हिंग रूमच्या साइजप्रमाणे निवडावा. जेणेकरून तो जास्त अवजडही वाटायला नको. त्याची रंगसंगती थीमनुसार पहावी.

■ फाल्स सिलिंग व कॉव्ह लाइटची चॅन रचना करावी. एखादे सुंदर झुंबर जर थीममध्ये बसत असेल तर लावावे. एपंदरीत काय आपल्या लिव्हिंग रूममधील सोफा, डायनिंग, एरिया एंट्रन्स, त्यांचे रंग हे सगळे एकमेकांशी संवाद साधत आहेत असे भासले पाहिजे. घर छोटे वाटेल असे फर्निचर निवडू नका.

■ रूम छोटी असेल तर शक्यतो जमिनीला लागून सोफा वगैरे घेऊ नका. सोफा थोडा उंचीवर असावा. अशा प्रकारे सगळय़ा गोष्टींची एकमेकांशी सुंदर सांगड घालत आपली लिव्हिंग रूम सजवावी