Election 2024 – 4 जून नाही तर 2 जूनला लागणार निकाल, दोन राज्यांबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा व चार राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तारखांची घोषणा केली. या सर्व निवडणूकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. मात्र रविवारी निवडणूक आयोगाने यात एक बदल केला आहे.

अरुणाचल प्रदेश व सिक्किम या दोन्ही राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूका देखील होणार आहेत. मात्र या दोन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ 2 जून रोजी संपत आहे. त्यामुळे काही केल्या निवडणूकीचा निकाल 2 जूनच्या आधी लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या दोन्ही राज्यांच्या विधानसभेच्या निकालाची तारिख बदलली असून आता या दोन राज्यांचा निकाल 2 जून रोजी लागणार आहे.