दुष्काळसदृश भागातील दहावी,  बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ

राज्य सरकारच्या निर्णयानुसार टंचाई, दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी राज्य शिक्षण मंडळ स्तरावरून भरण्यात येणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश 40 तालुके आणि 1021 महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील दहावी, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांची फी माफीसाठीची यादी शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळविण्यासाठी पात्रतेच्या आवश्यक माहितीसह स्वतःच्या, पालकांच्या-आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेजशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. याविषयी सविस्तर माहिती http://majahsscboard.in या शिक्षण मंडळाच्या या वेबसाईटवर देण्यात आली आहे.