जालन्यातील भोकरदन – जाफराबाद तालुक्यात गारपीट; शेतात व रस्त्यावर गारांचा खच

जालन्यातील भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील काही भागात आज सायंकाळच्या सुमारास जोरदार गारपीटीने झोडपून काढले असून आंब्यासह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या अवकाळीपणामुळे शेतकरी पूर्णतः मेटाकुटीस आला आहे. जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णीसह परिसरात अवकाळी पाऊस, झाला असून निवडुंगा, पोखरी,शिराळा देऊळगाव राजासह काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे.

सर्वांधिक दावतपुर, लिंगेवाडी परिसरात गारांचा फटका भोकरदन तालुक्यातील दावतपूर, टाकळी परिसरात सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास प्रचंड गारपीट झाली असून गारपीटीमुळे आंबा,गहू,मकाचे प्रचंड नुकसान झाले. तर लिंगेवाडी येथे मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली असून शेतात गारांचा खच पडला होता. गारांचा पाऊस जोराचा असल्याने वाहनधारकांनी जागेवर वाहन सोडून आडूशाच्या ठिकाणी आपला बचाव केला. तर रस्त्यावर व शेतात गारांचा खच पडलेला दिसून येत होता.

भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथे आज सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यावेळी गारांचा खच पडला होता. भोकरदन तालुक्यातील सिपोरा परिसरातील दावतपुर, टाकळी परिसरात आज सायंकाळच्या सुमारास गारांचा पाऊस पडला. त्यामुळे आंबे गळून पडल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. तर रस्त्यावर गारांचा खच पडला होता.