सनी देओल दिसणार करण जोहरच्या कॉफी विथ करण शो मध्ये

‘गदर २’ च्या दमदार यशानंतर बॉलीवूड अभिनेता सनी देओल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. ‘गदर 2’ च्या यशानंतर लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे अलिकडे तो मुलाखतींमध्येही दिसू लागला आहे. विशेष म्हणजे सनी देओल करण जोफरचा प्रसिद्ध शो कॉफी विथ करणमध्येही दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या शोमधून तो नेमकी कोणती गुपितं सांगणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

सनी देओलने आपल्या करिअरमध्ये एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. त्याच्या वडिलांप्रमाणेच त्याची इंडस्ट्रीत प्रतिष्ठा असून आजही लोकं त्याच्या सिनेमांना पसंती देतात. याचा अंदाज सर्वांनाच आला. 22 वर्षानंतर ‘गदर 2’ आला आणि बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने बक्कळ कमाई केली. आता सनी करणच्या कॉफी विथ करणमध्ये दिसणार आहेत.

सनी देओलने नुकतीच ‘कॉफी विथ करण शो’ची शुटींग केली आहे. शो मध्ये त्याची उपस्थिती किती वेळ असेल याची काही कल्पना नाहीय. पण चाहत्यांना या शो बाबत जास्त उत्सुकता आहे. त्यांना सनी देओलच्या वैयक्तितक आयुष्याबाबतची गुपितं जाणून घ्यायची आहेत. या शोच्या माध्यमातून कॉफी विथ करणमध्ये 18 वर्षानंतर सनी दिसणार आहे. मागच्यावेळी तो 2005 मध्ये या शोचा हिस्सा बनला होता.

सनी देओलचा सिनेमा ‘गदर 2’ ने 500 कोटीहून अधिक कमाई केली. याचबरोबर सनी देओल 500 कोटींहून अधिक कमाई करणारा बॉलिवूड अभिनेता बनला आहे. यावर्षात तीन सिनेमांनी 500 कोटींची कमाई केली त्यात ‘जवान’, ‘पठाण ‘सिनेमांनंतर ‘गदर 2’ ही सहभागी आहे.