लाखो भक्तांनी घेतले मत्स्योदरी देवीचे दर्शन; एक लाखांहून अधिक भाविक दाखल

मराठवाड्यासह जालना जिल्ह्यासह अंबड घनसावंगी तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या मत्स्योदारी देवीच्या यात्रेचा शनिवारी मुख्य दिवस होता. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. मंदिरातील सुरक्षा व्यवस्था भाविकांच्या गर्दीमुळे काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. सायंकाळपर्यंत एक लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

मनोकामना पूर्ण करणारी मत्स्योदरी देवी अशी ख्याती असलेल्या मत्सोदरी देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यभरातून लाखो भाविक गर्दी करतात. या उत्सवास हजारो वर्षांची परंपरा असल्याचा उल्लेख स्कंद पुराणांसह इतर प्राचीन ग्रंथात आढळते. स्कंदपुराणाची रचना दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याने या स्थानाचे महात्म्य हजारो वर्षांपासून आहे हे सिद्ध होते. नवरात्र काळात दूरवरून येणाऱ्या भावीकामुळे अंबड शहर नऊ दिवस भक्ती रसात न्हाऊन निघते. घराण्यात पूर्वपार चालत आलेली परंपरा आणि देवीसमोर बोललेला नवस फेडण्याचा इराद्याने आपल्या नातेवाईक, मित्रासोबत तसेच नोकरीनिमित्त व व्यापाऱ्या निमित्तआलेले व आता बाहेर गावी असलेले मुद्दाम दर्शनासाठी येतात.अंबडमध्ये दाखल होणारा भाविकांचे ताफे देवीवरील वाढत्या श्रद्धेचा व भक्तीचा साक्षात्कार असल्याच्या प्रत्यय सर्वाना येत होता. भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता संस्थानने ही तयारी केली होती. महसूल कर्मचारी ,तलाठी, मंडळ अधिकारी प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष ठेऊन होते.पोलीस यंत्रणे बरोबरच , पथक, आय.टी. आय. चे पथक यांच्यासह ,अंबुलन्स सेवा,अग्निशमन पथक उपजिल्हा रुग्णालयाचे पथक,यांच्या सह सात पथके गर्दीवर नियंत्रण व सुरक्षेसाठी होती.

मत्स्योदरी देवीसमोर असलेल्या नगारखान्याजवळून मुले टाकण्याची, प्रत्येक पायरी विशेष दर्शन नारळ फोडणे, दिवे लावणे, कापुर लावणे वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आहे.पोर्णिमेच्या दिवशी तीन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. अंबरीश राजाने देवीला बालकाचे रक्षण असा वर मागितला होता व देवीने त्यांला असे कबूल केले होते. त्या मुळे ही प्रथा अजूनही आहे.फक्त आता उंची कमी केली आहे.यंदाही महसूल कर्मचारी व तलाठी व्यवस्थापक कैलास शिंदे त्यांना मदत करण्यासाठी परिश्रम घेतले.