150 खासदारांच्या निलंबनावर चर्चा का नाही, धनकड यांचाच विषय का चर्चेत आहे? राहुल गांधी यांचा सवाल

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरात राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची नक्कल केल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशी प्रक्रारचे कृत्य केल्याने माझ्या पदाचा आणि माझ्या समाजाचा अपमान झाल्याचे धनकड यांनी म्हटले आहे. तर पंतप्रधान मोदीही संसदेत नक्कल करतात. नक्कल करणे यात काय अयोग्य आहे, असा सवाल विरोधकांनी केला आहे. आता या सर्व घटनेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संसद परिसरात खासदार निदर्शने करत होते. आपण मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. तो व्हिडीओ आपल्या फओनमध्ये आहे. मात्र, प्रसारमाध्यमे या घटनेचा व्हिडीओ प्रसारीत करत आहेत. या घटनेनंतर फक्त धनकड यांची नक्कल केल्याचा मुद्दाच चर्चेत आहे. संसदेतून तब्ब्ल 150 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेत घुसखोरी झाली आहे, या गंभीर मुद्द्यांवर चर्चाच होत नाही. सरकारला यावर चर्चा करायची नसल्याने अधिवेशन भरकटवण्याचा आणि जनतेचे लक्ष इतर मुद्द्यांकडे वळवण्याचा प्रयत्न होत आहे.

संसदेत झालेली घुसखोर, 150 खासदारांचे निलंबन, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती महागाई असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्यावर कोणीही चर्चा करत नाही. प्रसारमाध्यमांवर या गंभीर विषयावर काहीच चर्चा नाही. अदानींच्या मुद्दा, राफेलचा मुद्दा, बेरोजगारी यावर चर्चा नाही. त्यामुळे आमचे खासदार निराश होऊन संसदेवर बाहेर आहेत. मात्र, प्रसारमाध्यमांचे त्याकडे लक्ष नाही. प्रसारमाध्यमे फक्त धनकड यांच्या मुद्दाचीच चर्चा करत आहेत. यावरही राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.