पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगावजवळ खासगी बसची ट्रकला धडक; 43 प्रवासी जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर पेठ (ता.आंबेगाव) येथे खाजगी आराम बसने पुढे असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 43 प्रवासी जखमी झाले आहेत.सदर अपघात शुक्रवारी मध्यरात्री 1.00 वाजता झाला.

मालवाहू ट्रक पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा होता. याचवेळी खाजगी आराम बसने ट्रकला मागून धडक दिली. खाजगी आराम बस मधील जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमींना तातडीने वायसीएम ससून हॉस्पिटलला नेण्यात आले. खाजगी आराम बस मधील सर्व जखमी नेपाळचे रहिवासी आहेत. घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट देत अपघाताची माहिती घेतली. ट्रक चालक गोरेलाल सोलंकी (रा.राजपूर मध्यप्रदेश), स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी जखमीना वैद्यकीय उपचारासाठी मंचर रुग्णालयात दाखल केले आहे.