Salman Khan Firing Case : गोळीबाराचा कट बिहारमध्ये शिजला?

अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. गोळीबाराचा कट हा बिहारमध्ये शिजल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. सलमान खानला घाबरवण्यासाठी हा गोळीबार झाला होता. शूटर हे मुंबईत कोणाकोणाला भेटले होते, त्यांना ते पिस्तूल आणि पैसे कोणी दिले होते याचा तपास युनिट 9 करत आहे.

गेल्या रविवारी पहाटे अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली होती. गोळीबारप्रकरणी गुन्हा नोंद करून युनिट 9 ने तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास करून विकी गुप्ता आणि सागर पालला गुजरातच्या भुज येथून बेडय़ा ठोकल्या. गोळीबाराचा कट हा बिहारमध्ये शिजल्याची प्राथमिक माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. विकी आणि सागरला गोळीबार करण्यासाठी 4 लाख रुपयांची सुपारी मिळाली होती. त्यातील एक लाख रुपये हे त्यांना आगाऊ दिले होते, तर उर्वरित तीन लाख रुपये हे काम झाल्यावर दिले जाणार होते असे सूत्रांनी सांगितले.

विकी आणि सागरला सलमानच्या घरावर दोन राऊंड फायर करण्याचे टार्गेट दिले होते. हल्लेखोरांना 50 हजार रुपये ऑनलाईन मिळाले होते. त्यांनी त्या पैशातून काय काय केले याचा तपास पोलीस करत आहेत. सागर आणि विकी हे दोघे बिहारचे रहिवासी आहेत. त्यामुळे गोळीबाराचा कट हा बिहारमध्ये शिजला गेल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. गोळीबार केल्यानंतर अमोल बिष्णोईने याची जबाबदारी स्वीकारली होती. अमोलने फेसबुकवरून एक पोस्ट अपलोड केली होती. ते खाते परदेशातील आहे.

आणखी एकजण हरयाणातून ताब्यात

आज सायंकाळी तपास पथकाने हरयाणा येथून एकाला ताब्यात घेतले आहे. सोनू गुप्ता असे त्याचे नाव आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. गोळीबार केल्यानंतर विकी आणि सागर हे भुजला गेले होते. ते भुजलाच का गेले होते, तेथे त्यांचे कोणी अन्य साथीदार आहेत का याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक भुजला जाणार आहे. तसेच विकी आणि सागर हे गोळीबार करण्यापूर्वी मुंबई आणि आसपासच्या परिसरातदेखील राहिले होते. ते त्या काळात कोणाला भेटले होते याचा तपास पोलीस करणार आहेत.

आणखी चार पथके

सलमान खान गोळीबार प्रकरणाचा तपास खोलवर केला जाणार आहे. गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिष्णोईने घेतली होती. त्यामुळे बिष्णोई गँग विरोधात पोलीस आणखी खोलवर माहिती गोळा करत आहे. पोलिसांचे पथक गुजरात. दिल्ली, राजस्थान आणि बिहार येथे जाणार आहे. भविष्यात बिष्णोई गँग विरोधात मोक्का विरोधात कारवाईची गरज पडल्यास ती माहिती पोलिसांना उपयुक्त ठरणार आहे.

z गोळीबारासाठी पिस्तूल पुरवणाऱयाचा शोध सुरू
z पोलीस लॉरेन्स बिष्णोईची कोठडी घेण्याची शक्यता
z अमोल बिष्णोई हा विकी आणि सागरच्या थेट संपका&त होता.

पोलीस नोंदवणार सलमानचा जबाब?

गोळीबार प्रकरणात आता पोलीस अभिनेता सलमान खानचा जबाब नोंदवणार असल्याचे समजते. गोळीबार घटनेनंतर पोलीस जेव्हा सलमानच्या घरी गेले होते तेव्हा सलमान हा प्रचंड नाराज होता. आरोपींना वाहन आणि शस्त्र पुरवणाऱयांचा पोलीस शोध घेत आहेत.