वांद्रे कुर्ला संकुलात सॅमसंग लाईफस्टाईल एक्सपिरिअन्स डेस्टिनेशनचे उद्घाटन

सॅमसंगची सर्वोत्कृष्ट आणि अत्याधुनिक उत्पादने एका छताखाली ग्राहकांना पाहता येणार आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलामध्ये सॅमसंगने जीवनशैली अनुभव केंद्राची अर्थात लाईफस्टाईल एक्सपिरिअन्स स्टोअरची सुरूवात केली आहे. इथे ग्राहकांना सॅमसंगची सर्वोत्कृष्ट उत्पादने पाहता येतील, त्यांच्या वापराचा अनुभव घेता येईल आणि ती विकतही घेता येतील. इथून विकत घेतलेल्या उत्पादनाची देशाच्या कोणत्याही भागात घरपोच सेवा दिली जाईल असे सॅमसंगतर्फे सांगण्यात आले आहे.

जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये 8हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात हे स्टोअर उभे करण्यात आले आहे. इथे येणाऱ्या ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी S24 या मोबाईलसाठी इतरांच्या आधी नोंदणी करता येऊ शकेल. ऑनलाईन टू ऑफलाईन पद्धतीचे हे देशातील पहिले स्टोअर आहे. म्हणजेच ऑनलाईन नोंदवलेल्या गोष्टी या स्टोअरमधून घरी नेता येऊ शकतील. या स्टोअरमध्ये 8 विविध विभाग करण्यात आले असून यामध्ये सॅमसंगची विविध उत्पादने ग्राहकांसमोर अनुभवासाठी ठेवण्यात आली आहे. सॅमसंगची उत्पादने बाजारात येण्यापूर्वी ग्राहक या स्टोअरमध्ये ती पाहू शकतील आणि त्यांचा अनुभव घेऊ शकतील.