शेअर बाजारात विक्रमी तेजी; निर्देशांक 72 हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता

जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचे वातावरण आहे. तसेच अनेक शेअर बाजार मंदीच्या सावटाखाली आहेत. असे असतानाही हिंदुस्थानचा शेअर बाजार तेजीत आहे. डिसेंबर महिना शेअर बाजारासाठी जबरदस्त लाभदायक ठरला आहे. तसेच या महिन्यातच आपला शेअर बाजार जगातील पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार ठरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारानेही 21 हजाराचा टप्पा पार केला आहे. मुंबईचा शेअर बाजारही 72 हजाराचा टप्पा लवकरच गाठण्याची शक्यता आहे.

या वर्षात मुंबई शेअर बाजारात सुंमारे 3000 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच या बाजाराने गुतंवणूकदारांना 4 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार तुफआन तेजीत असून त्यांची घोडदौड अशीच सुरू राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 30 शेअर असलेला मुंबई शेअर बाजार नवेनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. आता मुंबई शेअर बाजार लवकरच 72 हजाराचा टप्पा गाठेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बाजाराच्या तिसऱ्या दिवशी बुधवाराही तेजीचे वातावरण होते. पहिल्या सत्राच्या कारभारात निर्देशाकांने तब्बल 450 अकांनी उसळी घेतली. सुरुवातीच्या तासाभराच निर्देशांक 72 हजाराच्या जवळ पोहचला होता. निर्देशांक 71,913 पर्यंत पोहचला होता. त्यामुळे आठवड्याभरात निर्देशांक 72 हजाराचा टप्पा गाठेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 71,913 हा बाजाराने ऑल टाईम हाय गाठला आहे.

बाजाराची सुरुवात बुधवारी 71,647 वर उघडला होता. तल मंगळवारी बाजार 71,521 वर सुरू झाला होता. बुधवारी बाजाराने तासाभरातच सुमारे 300 अंकांची उसळी घेतली होती. मुंबई शेअर बाजारासह राष्ट्रीय शएअर बाजारातही जबरदस्त तेजी आहे. या वर्षभरात निफ्टीने गुंतवणूकदारांना 4.40 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर बुधवारी निफ्टीचा निर्देशांक 21,593 या ऑल टाईम हायवर पोहचला होता.