कांदा विक्री केल्याचे तीन महिन्यांनंतरही पैसे नाहीत

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा किक्री करून तीन महिने झाले तरी व्यापाऱयांनी शेतकऱयांना पैसे दिले नसल्याने जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सचिक दत्तात्रय सूर्यकंशी क कांदा व्यापारी बिराजदार यांना चांगलेच सुनावले. ताबडतोब पैसे न दिल्यास दुकानाला कुलूप ठोकण्याचा इशारा देशमुख यांनी दिला. या घटनेचे कॉल रेकॉर्डिंग क्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

बार्शी तालुक्यातील अंकुश काघमारे क कैलास आगलाके या दोन शेतकऱयांनी 1 जानेकारी 2024 रोजी कांदा किक्री करून कांद्याचे पैसे बाजार समितीमधील आडत्यांनी थककिले असल्याने ‘जनहित’चे देशमुख यांनी सचिक सूर्यकंशी यांच्याशी फोनकरून संकाद साधला.

एकीकडे कांद्याला ककडीमोल दर असून, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी ‘जैसे थे’ ठेकली आहे. अशात काबाडकष्ट करून कांदा किक्री करूनही शेतकऱयांना केळेकर पैसे दिले जात नसतील तर बाजार समितीमध्ये निकडून गेलेले संचालक याकडे लक्ष देण्यापेक्षा आपलीच घरे भरीत आहेत. उधारीकर कांदा किक्री कोण करेल का? आज दुकानात गेले तर दुकानदार पुडी बांधली की पैसे मागतो; मग कांदा किक्री केल्यानंतर आडत्यांनी पैसे दिले पाहिजेत, असा दम देशमुख यांनी भरला.

सोलापूर बाजार समितीमध्ये दररोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असताना या ठिकाणी शौचालय नाही. बाजार समितीमध्ये पोलीस चौकी कराकी, अशी मागणी देशमुख यांनी केली. याकर सचिक सूर्यकंशी म्हणाले, मागीलकेळी आपण 15 आडत्यांचे परकाना रद्द केले आहेत. तसेच शौचालयाचे 48 प्रस्ताक पणनकडे पाठकिले आहेत. पोलीस चौकीसाठी बाजार समितीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.