विधानसभा अध्यक्षांच्या नव्या वेळापत्रकावरही न्यायालय नाराज; 31 डिसेंबरपर्यंतची दिली मुदत

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी झाली. आज पुन्हा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना चांगलेच सुनावले आहे. अध्यक्ष निर्णय घेत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आता सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

आम्ही मे महिन्यात निर्णय देऊनही आतापर्यंत काहीही करण्यात आले नाही. त्यामुळे आता सरन्यायाधीशांनीच याबाबत 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पुन्हा एकदा वेळ वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, सरन्यायाधीशांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला. आता सर्वोच्च न्यायालयात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याबाबत सुनावणी होणार आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्षांना याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.