म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील विजेत्यांना मिळाले देकारपत्र

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5311 सदनिकांच्या विक्रीसाठी 24 फेब्रुवारी रोजी ठाण्यात सोडत काढण्यात आली होती. अवघ्या महिनाभराच्या आत या सोडतीमधील विजेत्यांना म्हाडाकडून तात्पुरते देकारपत्र मिळाले आहे. त्यामुळे विजेत्यांना दिलासा मिळाला आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये 5311 सदनिकांपैकी 2278 सदनिका प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या योजने अंतर्गत असल्याने 3033 सदनिकांसाठी संगणकीय सोडत 24 फेब्रुवारी रोजी काढण्यात आली होती. नवीन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून महिनाभराच्या आत अर्जदारांना  विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र मिळाले आहे. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजने अंतर्गत विजेत्यांना सदनिकेच्या एकूण किमतीच्या 1 टक्के प्रशासकीय रक्कम देकारपत्र मिळाल्यापासून 30 दिवसांत म्हाडाकडे भरावी लागणार आहे. त्यानंतर सदनिकेची उर्वरित रक्कम विकासकाने दिलेल्या वेळापत्रकानुसार लाभार्थ्यांना भरावी लागणार आहे.