राज्यसभेसाठी तृणमूलची यादी तयार; निवडणुकीसाठी या सहा जणांची नावे

तृणमूल काँग्रेस (TMC) ने सोमवारी 24 जुलै रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते डेरेक ओ’ब्रायन आणि साकेत गोखले यांच्यासह सहा उमेदवारांचे उमेदवारी जाहीर केले.

इतर उमेदवार – डोला सेन, सुखेंदू शेखर रे, समीरुल इस्लाम आणि प्रकाश चिक बराईक हे असणार आहे.

‘आम्ही आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी डेरेक ओ’ब्रायन, डोला सेन, सुखेंदू शेखर, समीरुल इस्लाम, प्रकाश चिक बराईक आणि साकेत गोखले यांची उमेदवारी जाहीर करताना खूप आनंद होत आहे’, टीएमसीने आपल्या अधिकृत हँडलवर ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘ते लोकांच्या सेवेसाठी कायम कार्यरत राहतील आणि तृणमूलच्या विचारांचा आणि प्रत्येक हिंदुस्थानींच्या हक्कांसाठी लढण्याचा चिरस्थायी वारसा कायम ठेवतील. आम्ही आमच्या या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा देतो’, असं पक्षाकडून ट्विट करण्यात आलं आहे.

डेरेक ओब्रायन, सुखेंदू शेखर रे आणि डोला रे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्यामुळेच टीएमसीने त्यांची उमेदवारी पुन्हा जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलै रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने (EC) केली.