बहुचर्चित ‘घुमर’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

अखेर प्रतीक्षा संपली असून घूमर या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लाँच झाला आहे. जो प्रेक्षकांना अनोख्या भावना, प्रेरणा आणि परिवर्तनात्मक कथा दाखवणार असल्याचं समजतंय. घुमर च्या टीझर आणि पोस्टर आल्यापासून हा चित्रपट काय असणार याचा सोशल मीडिया वर चर्चा सुरु असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता अभिषेक बच्चन दूरदर्शी दिग्दर्शक आर. बाल्की आणि अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री सैयामी खेर यांच्या दमदार भूमिका घूमर मधून अनुभवयाला मिळणार आहेत. भारतातील स्पोर्ट्स चित्रपटाच्या यादीत आता अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे.

या ट्रेलब्लॅझिंग सिनेमॅटिक चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत असून त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण येते आणि जेव्हा तो पॅराप्लेजिक खेळाडू ला ट्रेन करताना दिसतोय जी भूमिका अभिनेत्री सैयामी खेर साकारणार आहे. पुन्हा एकदा र्दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या दिग्दर्शनाची जादू या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.