क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱया दोघांवर कारवाई

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱया दोघा तरुणांना गुन्हे शाखा युनीट-3च्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ते सट्टा खेळत असलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

मेट्रो सिनेमाजवळ असलेल्या किटपॅट बार अॅन्ड रेस्टॉरंट या हॉटेलात बसून दोन तरुण आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळत असल्याची माहिती युनीट-3मधील अंमलदार गिरकर यांना मिळाली. त्यानुसार माहितीची शाहनिशा करून पथकाने तेथे धडक दिली असता सुनी कारिया (40) आणि ऋषभ जैन (26) असे दोघे दोन संकेतस्थळांवर आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळताना सापडले. दोघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.