विधानसभेपर्यंत तरी महायुती टिकेल का? अजित पवार गटाच्या आमदाराच्या विधानाने गद्दारांना धास्ती

लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीतल्या पक्षांमध्ये अनेक दिवस रस्सीखेच सुरू होती. मात्र  या रस्सीखेचीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी महायुती टिकेल का, अशी भीती व्यक्त केली आहे. शेळके यांच्या या विधानामुळे महायुतीत आतापासूनच महाभीती शिरली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनील शेळके म्हणाले, या महिन्यानंतर काय होईल ते माहिती नाही. महायुती टिकावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. एक महिन्यानंतर सगळी मंडळी कशी पटापटा पळतील त्याचा मी विचार करतोय. ही माणसे मला सापडतच नव्हती. गेली चार-साडेचार वर्षे मला बघितले की पळायची, मला बघितले की इकडे-तिकडे बघायची. आज सगळे सापडले, असे शेळके यांनी आपल्या गटातील आमदारांना शालजोडीतले ठेवून दिले आहेत.

तुमच्या खाली मी सुरुंग लावून आलोय!

गणेश भेगडे… तू गळय़ात पडायच्या आधी तुला कसे ढकलायचे, याचा विचार आम्ही करतोय. तुम्हालाही माहिती नसेल तुमच्या खाली मीसुद्धा सुरुंग लावून बसलो आहोत अशा शब्दात शेळके यांनी पुणे ग्रामीणचे गणेश भेगडे यांना इशारा दिला आहे.