अंकिता- विवेक रिव्हर्स मोशनमध्ये, मराठी गीतातील एक भन्नाट प्रयोग

मराठीत नवनवीन धाडसी प्रयोग व्हायला लागलेत. असाच एक वेगळा प्रयोग म्हणजे रिव्हर्स मोशनमधले गाणे. प्रणील आर्टस्चे ‘कसे विसरू?’ हे गाणे असेच हटके आहे. अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, नातं बहरू लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण काय असू शकतं? हे व्यक्त करणारी कधीही न पाहिलेली ‘सरळ चालणाऱया नाजूक नात्याची ही उलटी गोष्ट’ म्हणजेच ‘कसे विसरू?’.

गाण्याची पटकथा, दिग्दर्शन, मांडणी ही प्रणील हातीसकरने केली आहे. गायक केवल वाळंज यांच्या सुमधुर आवाजात हे गाणे स्वरबद्ध झाले आहे. केकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर व अभिनेता विवेक सांगळे ही जोडी ‘कसे विसरू?’ या गाण्यातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

एखादी गोष्ट सरळ दाखवणं हे रिव्हर्स मोशनच्या तुलनेत बऱयापैकी सोपे आहे. कारण जेव्हा गोष्ट उलटी उलगडत आपण नेतो, त्या वेळेस कलाकारांचे हावभावसुद्धा बदलतात. ही गोष्ट फार बारकाईने करावी लागते आणि तेच बारकावे ‘कसे विसरू?’ मध्ये आपणास पहावयास मिळतील.