स्त्री-मुक्तीचा जागर

>>  अनघा सावंत

हिंसामुक्त, आनंदी, सुदृढ समाज घडवण्यासाठी स्त्री मुक्ती संघटना ही स्वयंसेवी संघटना गेली 48 वर्षे महाराष्ट्रात, देशात तसेच जागतिक पातळीवर कार्यरत आहे.

1975 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने ‘महिला वर्ष’ म्हणून घोषित केल्यानंतर शारदा साठे, छाया दातार या कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने मुंबईत स्त्राrमुक्ती संघटनेची स्थापना झाली, तर संघटनेचा जाहीरनामा 1978 साली आकाराला आला. स्त्रियांच्या प्रश्नावर जनजागृती करणारी, त्यांना संघटित करणारी ही एक स्वयंसेवी संघटना आहे, अशी माहिती संघटनेच्या संस्थापक-सदस्य, विश्वस्त आणि सचिव अमोल केरकर यांनी दिली. स्त्रीमुक्ती संघटना आणि इतर स्त्री संघटनांनी स्त्रियांवरील हिंसेच्या प्रश्नांमागील तात्त्विक भूमिका मांडली आणि देशव्यापी चळवळ सुरू केली. त्यातूनच पुढच्या तीन-चार दशकांत अनेक प्रश्न मार्गी लागले. कायद्यांमध्ये सुधारणा झाल्या तसेच नवीन कायदेही झाले.

शिक्षण, रोजगार या क्षेत्रांत स्त्रियांना बरोबरीने संधी आणि समाजात समान स्थान मिळाले पाहिजे, हा विचार कला पथक आणि पोस्टर्स प्रदर्शनाच्या प्रभावी माध्यमातून अगदी अशिक्षित स्त्राrपर्यंतही पोहोचवण्यासाठी संघटनेने काम सुरू केले. बलात्कार, हुंडा प्रथा यांविरोधात इतर संघटनांबरोबर मोहिमा केल्या.

1985 साली स्त्राrमुक्ती संघटनेने कौटुंबिक सल्ला आणि समुपदेशन केंद्र सुरू केले. याद्वारे कौटुंबिक समस्या निवारण केंद्राद्वारे पीडित स्त्राrला वैयक्तिक किंवा कौटुंबिक समुपदेशन केले जाते तसेच गरज भासल्यास सर्वतोपरी मदत केली जाते. 1986 सालापासून ‘प्रेरक ललकारी’ हे मासिक मुखपत्रही खंड न पडता सुरू आहे.

संस्थेचे मुख्य कार्यालय दादर येथे असून आज संघटनेचे सर्व उपक्रम एके ठिकाणी चालू शकतील अशी आमची वास्तू कोपरखैरणे इथे उभी आहे. ते स्त्राr चळवळीचे सांस्कृतिक केंद्र बनावे अशी आमची मनीषा आहे, अशी भावना अमोल केरकर यांनी व्यक्त केली.

पाळणाघर… यशस्वी उपक्रम

नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱया स्त्रियांना दुहेरी जबाबदाऱया पार पडताना पाठबळ मिळावे यासाठी संघटनेने सह्यांची एक मोहीम राबवून ‘संस्थात्मक पाळणाघरां’ची कल्पना लोकांपर्यंत पोहोचवली. 1989 साली नवी मुंबई, बोरिवली व मुलुंड इथे हाऊसिंग सोसायटीमध्ये तीन महिने ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ‘पाळणाघरे’ सुरू केली. आता दहा पाळणाघरे मुंबई परिसरात चालतात.

शाळांमध्ये जिज्ञासा संघटनेने इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ आणि मुंबई पोलीस (अमली पदार्थ विरोधी पथक) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिज्ञासा उपक्रम’ 1996 साली सुरू केला. कुमार वय, ताणतणाव, व्यसनमुक्ती, मूल्यशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन आणि लैंगिक शिक्षण या सहा विषयांवर शाळांमध्ये ‘जिज्ञासा उपक्रम’ राबवण्यात सुरुवात केली.

कष्टाचा योग्य मोबदला

1998 मध्ये संघटनेने सर्वात वंचित अशा कचरा वेचणाऱया स्त्रियांचे सर्वेक्षण केले. घाणीतील काम, अपुरे आणि अनिश्चित उत्पन्न, अनारोग्य, दारिदय़ यांनी पिचलेल्या या स्त्रियांना संघटनेने संघटित करण्यास सुरुवात केली. त्यांचे बचत गट बांधले. स्वच्छता, आरोग्य इत्यादी विषयांवर प्रबोधन केले. ओल्या कचऱयापासून खत करण्याचे प्रशिक्षण तसेच सुक्या कचऱयाचे वस्ती पातळीवर एकत्रीकरण अशा गोष्टींमुळे त्यांच्या कष्टाचा त्यांना योग्य मोबदला मिळणे शक्य झाले. तसेच परिसर विकास उद्योग व घन कचरा व्यवस्थापनाची योजनाही संघटना यशस्वीपणे राबवीत आहे.