वन डे – जलदेवतेने कवेत घेतलेलं जुवे बेट

निळ्याशार पाण्याने वेढलेलं जुवे बेट. निसर्गसौंदर्याने नटलेल्या व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जुवे बेटाला जलदेवतेनेच आपल्या कवेत घेतले आहे. राजापूर तालुक्यातील हे जुवे बेट म्हणजे कोकणातील पर्यटनाचा खजिना आहे. या खजिन्यापर्यंत पोहोचायला होडीशिवाय दुसरे कोणतेही माध्यम सध्या नाही.

होडीने कसे जाल…

– बुरंबीवाडी ते जुवे हा एक किलोमीटर प्रवास.

– जैतापुर ते जुवे दोन किलोमीटर अंतर.

– धाऊलवल्लीवरून जुवे बेटावर जाण्यासाठी दोन किलोमीटर प्रवास.

– धाऊलवल्ली खारभूमी बंधारा ते जुवे बेट हे दीड किलोमीटर अंतर.

– केरावळेवाडी ते जुवे हा सहाशे मीटर तर आगरवाडी ते जुवे पाचशे मीटर होडीचा प्रवास करावा लागतो.

जुवे बेटावर 112 घरे आहेत. साधारण 78 लोक या बेटावर राहतात. गाव जैवविविधतेने नटलेले आहे. येथे चमचमीत सी-फूडचा आस्वाद घेता येतो. पर्यटकांनी जर आगाऊ सूचना दिली तर गावकरी पर्यटकांच्या भोजनाची व्यवस्था करतात.