महिला स्पेशल – ही आहेत सुरक्षित पर्यटनस्थळे

8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला मुंबईजवळच्या आणि बाहेरच्या काही सुरक्षित पर्यटन स्थळांची माहिती देत आहोत. विविध सर्वेक्षणांतून या पर्यटन स्थळांना महिलांसाठी अत्यंत सुरक्षित ठिकाणे मानली गेली आहेत.

कर्नाळा

कर्नाळा या पक्षी अभयारण्यालाही भेट देता येईल. येथे पक्ष्यांच्या सुमारे 200 प्रजाती आढळतात. हे ठिकाण मुंबईपासून 47.8 कि.मी. अंतरावर असून प्रवासासाठी 1 तास 20 मिनिटे लागतात. पनवेल स्थानकात उतरून कर्नाळ्याला जाता येईल. रस्ते मार्गे बस किंवा कॅब करून जाता येईल.

गायमुख चौपाटी

ठाण्याच्या घोडबंदर येथे असलेल्या गायमुख चौपाटी महिलांसाठी सुरक्षित आहेत. वनडे पिकनीकसाठीही हा स्टॉप चांगला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात उतरून रिक्षा, कॅबने गायमुख चौपाटीला जाता येईल.

कुफरी

हिमाचल प्रदेशातील शिमला जवळ एक छोटेसे हिल स्टेशन आहे. याचे नाव कुफरी आहे. कुफरी संपूर्ण बर्फाची चादरने ओढलेले असते. ही जागा महिलांसाठी खूपच खास आहे.

मुन्नार

देशातील सर्वात सुरक्षित पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे मुन्नार आहे. या ठिकाणी चहा मळे, नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवेगार रान पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. सोलो वूमन ट्रव्हल्ससाठी हे अविस्मरणीय स्थळ आहे.

पिंक सिटी

पिंक सीटी जयपूर महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा ओळखले जाते. जयपूरमध्ये हवा महल, जल महल, सिटी पॅलेस, आमेरचा किल्ला, जंतर मंतर, नाहरगढचा किल्ला प्रेक्षणीय आहे.