दिल्लीत नाट्यमय घडामोडी, मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक

मोदी सरकारची हुकूमशाही आणि दडपशाही सुरूच असून निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने ईडीच्या आडून आज शिखंडी डाव टाकला. दोन तासांच्या चौकशीचा फार्स करून ईडीने रात्री उशिरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्लीतील नाटय़मय घडामोडीनंतर आपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुरुंगात असले तरी केजरीवालच मुख्यमंत्री असतील, असे ठणकावत लढणार व भाजपला धडा शिकवणार, असा निर्धार आपने केला.

अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टाने नकार दिल्यानंतर ईडीचे पथक 10 वा समन्स आणि अटक वॉरंटसह केजरीवाल यांच्या निवासस्थानी सायंकाळी 7 च्या सुमारास पोहोचले. कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या चौकशीचे नाटय़ रंगले. आपचे कार्यकर्ते आणि केजरीवाल यांच्या समर्थकांनी निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. केजरीवाल यांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे तणावाचे वातावरण पसरले.

फोन काढून घेतला

चौकशी सुरू करण्यापूर्वी ईडीने केजरीवाल यांचा फोनही काढून घेतला. त्यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली. निवासस्थानातील सर्व लँडलाईनही बंद करण्यात आले. आपचे कार्यकर्ते आणि केजरीवाल यांच्या समर्थकांनी मोदी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. कार्यकर्ते ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्यकर्त्यांचा आवाज आणखी वाढल्यावर पोलिसांनी अनेकांना अक्षरशः फरफटत व्हॅनपर्यंत नेले.

इंडिया आघाडी एकजुटीने प्रतिकार करेल – शरद पवार

ऐन निवडणुकीत विरोधी पक्षाला टार्गेट करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा कापर केला जात आहे. सूडभावनेने कारवाई सुरू आहे. भाजप सत्तेसाठी किती खालची पातळी गाठू शकतं हे या कारवाईतून दिसून आले. केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा आम्ही निषेध करत असून या घटनाबाह्य कारवाईचा इंडिया आघाडी एकजुटीने प्रतिकार करेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठणकावले.

हा मोदी आणि भाजपचा कट

अरविंद केजरीवाल यांची अटक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा राजकीय कट आहे. मोदी केजरीवाल यांना घाबरतात. या प्रकरणाचा तपास गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या दोन वर्षांत ईडी आणि सीबीआयला एक रुपयाही मिळालेला नाही, अशी प्रतिक्रीया आपच्या नेत्या अतिशी यांनी दिली.  केजरीवालच दिल्लीचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील. ते तुरुंगातून दिल्लीचा कारभार चालवतील. त्यापासून रोखू शकेल असा कुठलाच कायदा अस्तित्वात नाही, असेही अतिशी यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले, सुनावणीआधीच कारवाई

आपने केजरीवाल यांना ईडीच्या कारवाईपासून संरक्षण देण्याला दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर आपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच ईडीने केजरीवाल यांना ताब्यात घेतले. दरम्यान, रात्री उशिरा आपच्या नेते आणि कायदातज्ञांनी याचिकेवर तातडीच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांच्या निवासस्थानी धाव घेतली.

भाजप घाबरला; प्रचारापासून रोखण्यासाठी अटक

तपास यंत्रणांचे 500 हून अधिक अधिकारी या प्रकरणावर काम करत होते. हजारांहून अधिक धाडी टाकण्यात आल्या. आपचे नेते, मंत्री, घरे सर्वत्र थाडी टाकल्या, पण एक रुपयाही मिळाला नाही. लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर केजरीवाल यांना आज अटक करण्यात आली. केजरीवाल एक विचार आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करून तुम्ही हा विचार संपवू शकता आणि त्यांना प्रचार करण्यापासून रोखू शकता, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात, असे अतिशी म्हणाल्या.

आप मदर ऑफ डेमोक्रसी मे हैदोन महिन्यांत दोन मुख्यमंत्र्यांना अटक!

मोदी सरकार किरोधकांचा आकाज दाबण्यासाठी यंत्रणांचा कापर करत आहे. दोन महिन्यांत इंडिया आघाडीतील दोन मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आणि आता अरकिंद केजरीकाल यांना ईडीने अटक केली. त्याशिकाय काँग्रेसची बँक खातीही गोठकण्यात आली आहेत. किरोधकांची चहुबाजूने कोंडी केली जात आहे. त्याकरून सोशल मीडियातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘मुस्कुराइये की आप मदर ऑफ डेमोक्रसी मे है…’ अशी उपरोधिक टीका केजरीकाल यांच्या अटकेनंतर नेटकऱयांनी केली.

डरा हुआ तानाशाह, मरा हुआ लोकतंत्र बनाना चाहता है…

डरा हुआ तानाशाह, एक मरा हुआ लोकतंत्र बनाना चाहता है… असा हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केजरीकाल यांच्या अटकेनंतर मोदींकर चढकला. मीडियासह सर्क संस्थांकर कब्जा, पक्षांची फोडाफोडी, कंपन्यांकडून हफ्ताकसुली, मुख्य किरोधी पक्षाचे बँक खाते गोठकणे हे सगळं सुरूच होतं. आता आसुरी शक्तीने जनतेने निकडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांचेही अटकसत्रही बेमालुमपणे सुरू केले आहे. इंडिया आघाडी याला चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.