अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

कथित अबकारी कर घोटाळा प्रकणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर ईडीचे पथक गुरुवारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालं होतं. दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला होता. केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला होता.

ईडीने पाठवलेल्या समन्सप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीच्या नोटीसनंतर अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी येण्यापूर्वी अटक न करण्याची हमी मागितली होती. मात्र, ती याचिका फेटाळून लावण्यात आली होती.

याचिका फेटाळून लावल्याच्या काही तासांतच ईडीचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालं होतं. तिथे दोन तास चौकशी केल्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली.