पुण्यात दहशतवाद्यांची मोठी साखळी! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

‘‘पुण्यात दहशतवाद्यांची मोठी साखळी उघड झाली आहेसर्वांना हादरा बसेल अशी ही साखळी आहेयाचे धागेदोरे खूप लांबपर्यंत आहेतते कुठे कुठे चालले आहेतहे जाहीरपणे व्यक्त करण्यास मला मर्यादा आहेत,’’ असा गौप्यस्फोट करून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह मंत्रालयालाच लक्ष्य केले.

पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पाच वर्षांचा मागोवा व वाटचाल’ या विषयावर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन आणि राष्ट्रपती पदक’ मिळाल्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सत्कार समारंभात पालकमंत्री पाटील यांनी हा गौप्यस्फोट केलाराज्यात मिंधेभाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे सरकार असताना ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृह मंत्रालयाला लक्ष्य करताना स्वतःच्या सरकारलाही घरचा अहेर’ दिला आहे.

पाटील पुढे म्हणालेपुणेपिंपरीचिंचवड शहरांत ड्रग्जचे प्रमाण भयंकर वाढत चालले आहे.  त्यामुळे ड्रग्जच्या विषयात कोणतीही तडजोड करू नकाड्रग्जवाल्यांवर कडक कारवाई करावी.