सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेनाही भाजपची ऑफर, शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही भाजपने ऑफर दिली होती असे समोर आले आहे. खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनीच ही बाब एका जाहीर सभेत बोलताना सांगितली. माझा लोकसभा निवडणुकीत दोनवेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणिती यांना भाजपमध्ये या अशी ऑफर देण्यात आली, असे शिंदे यांनी म्हटले.

एका कार्यक्रमात बोलत असताना सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले की, ” प्रणितीताई किंवा मला भाजपमध्ये या म्हणतात. ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो, जिथे आमचे बालपण गेलं, तारुण्य गेलं, आता मी 83 वर्षांचा आहे… आता मी कसा दुसऱ्यांशी घरोबा करणार? प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत कधीही पडणार नाही. “