4 कोटी 85 हजारांची रोकड जप्त ; आयटी विभाग करणार तपास  

पवई पोलिसांनी मंगळवारी रात्री नाकाबंदी दरम्यान एटीएमच्या गाडीतून सुमारे 4 कोटी 85 लाख 62 हजार 600 रुपयांची रोकड जप्त केली. याचा पुढील तपास आयकर विभाग करत आहे. आयकर विभाग पोलिसांना अहवाल देणार आहे. त्या अहवालानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या काळात अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी खास नाकाबंदी तैनात केली आहे. मंगळवारी रात्री पवई गार्डन येथे नाकाबंदी पॉइंट लावला होता. सहाय्यक निरीक्षक पवन यादव, उपनिरीक्षक पेंद्र हे तेथे तैनात होते. रात्रीच्या वेळेस एका पंपनीची पॅश व्हॅन आली. पोलिसांनी ती पॅश व्हॅन थांबवली. निवडणुकी दरम्यान खास एसएसटी पथकाने त्या पॅशव्हॅन चालकाकडे क्यूआर कोडची मागणी केली. त्याने एक क्यूआर कोड दाखवला. तो क्यूआर कोड वेगळा होता. याची माहिती रात्रपाळीस डय़ुटीला असलेले वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना दिली. काहीच वेळात सोनावणे तेथे उपस्थित झाले.

चालकाला गोरेगाव-अंधेरी असा क्यूआर कोडवर मार्ग दिला होता. मात्र तो चालक ठाणे मार्गे पवई येथे आला होता. तसेच त्याने काही कागदपत्रे दाखवली ती वेगळी होती. याची माहिती आयकर विभागाला दिली. आयकर विभाग घटनास्थळी आले. ती 4 कोटी 85 लाख 62 हजार 600 रुपयांची रोकड जप्त करून ती आयकर विभागाच्या स्वाधीन केली. आयकर विभाग याचा पुढील तपास करणार आहे.