नवऱ्याच्या मृतदेहाशेजारीच बायकोवर बलात्कार

महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटना सर्रास घडत आहेत. अशीच हादरवणारी घटना छत्तीसगडमधील अंबिकापूरमधून समोर आली आहे. जिथे एका नराधमाने एका व्यक्तीची हत्या केली आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाशेजारीच पत्नीवर बलात्कार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मणिपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जशपूरचे रहिवासी असलेले 42 वर्षीय सुखलाल दर्रीपारा येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी झोपडीत राहत होते. आपल्या पत्नीसोबत ते इथे राहात होते. सोमवारी मध्यरात्री दाम्पत्य जेवण करुण झोपले होते. दरम्यान रात्री 12 च्या सुमारास कार्तिक कोरवा (21) हा अचानक दाम्पत्याच्या झोपडीत शिरला आणि त्याने दाम्पत्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. कार्तिकने सुखलालच्या पत्नीसोबत आपले संबंध असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. प्रकरण इतके वाढले की, आरोपीने महिलेच्या नवऱ्याच्या डोक्यावर काठीने वार केला यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने पत्नीला धमकावून नवऱ्याच्याच मृतदेहाशेजारी बलात्कार केला.

पोलिसांनी ओरोपीला ताब्यात घेतले

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला. दरम्यान पीडितेने पोलिसांना सांगितले की, एका बाजूला पतीचा मृतदेह पडून होता त्याच्या शेजारीच आरोपी तिला धमकावत तिच्यावर बलात्कार करत होता. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीवर खून व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302, 376 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीने आपला गुन्हा  मान्य केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.