चंद्रचूड यांची फी होती फक्त 60 रुपये!

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून पहिला खटला लढला त्यावेळी केवळ 60 रुपये फी घेतली होती. यासंबंधीचा रंजक किस्सा स्वतः सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका सुनावणीदरम्यान सांगितला. सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी आपल्या पहिल्या खटल्यासाठी घेतलेली फी उपस्थितांना सांगितली. पहिल्या खटल्यासाठी चंद्रचूड यांनी केवळ साठ रुपये घेतले होते. सोमवारी विविध राज्यांतील बार कौन्सिलमध्ये नावनोंदणीसाठी जास्त शुल्क आकारण्यासंदर्भातील खटल्याची सुनावणी करत होते. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले, देशभरातील वकील म्हणून कायद्याच्या पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी 600 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाऊ शकत नाही. राज्य बार बॉडीजकडून आकारण्यात येणाऱया जास्त शुल्काला आव्हान देणाऱया याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. राज्य बार काwन्सिलकडून आकारण्यात येणाऱया फीमध्ये एकसमानता नाही. कायद्यात नमूद केलेल्या रकमेपेक्षा बार काwन्सिल जास्त शुल्क आकारू शकते का, हा कायदेशीर प्रश्न आहे, असे न्यायालयाने नमूद केले.