शरद पवारांची प्रकृती बिघडली, आजचे कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज बिघडली. त्यांचा घसा बसला असून थकवाही जाणवत आहे. त्यामुळे उद्याचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची सांगता सभा आज दुपारी आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला पवार कुटुंबातील सर्व मंडळी उपस्थित होती. या सभेमध्ये शरद पवार हे भाषण करत असतानाच त्यांच्या आवाजामध्ये थकवाी जाणवत होता. त्यामुळे ते केवळ 4 ते 5 मिनिटेच भाषण करू शकले. त्यानंतर सभेच्या ठिकाणी नागरिकांनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार, अशा घोषणा दिल्या.

– सभा संपल्यानंतर शरद पवार पुण्यातील गोविंदबाग येथील आपल्या निवीसस्थानी गेले. प्रकृती ठीक वाटत नसल्याने उद्याचे कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना पक्षाला देण्यात आल्या.