विमानतळावरून 14 कोटींचे कोकेन जप्त

केसांच्या कंडिशनरच्या बाटलीत आणि बॉडी वॉशच्या बाटलीमधून कोकेनची तस्करी करणाऱया केनियन महिलेला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अटक केली. तिच्याकडून 14 कोटी 90 लाखांचे कोकेन जप्त केले. ती कोकेन कोणाला देणार होती याचा तपास डीआरआय करत आहे. केनिया येथून एक महिला ड्रग घेऊन येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीनंतर गुरुवारी डीआरआयच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला. विमानतळावर ती महिला आली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तिच्याकडील साहित्याची तपासणी केली. तिच्या बॅगेत केसांच्या कंडिशनरची आणि बॉडी वॉशची बाटली आढळून आली. त्याच्यात पावडरयुक्त कोकेन होते. त्या दोन बाटल्यांमधून 1490 ग्रॅम कोकेन जप्त केले. कोकेन तस्करी प्रकरणी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.