जगज्जेत्यांना चिरडले, 2019 मधील फायनलचे उट्टे काढले; न्यूझीलंडचा इंग्लंडवर 9 विकेट्स राखून विजय

सगळ्या जगाचं लक्ष वेधणारं क्रिकेट विश्वचषकाचं बिगुल 5 ऑक्टोबरपासून वाजलं. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडचा नऊ विकेट्स राखून पराभव केला आहे. विशेष म्हणजे, 2019च्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात हेच दोन संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते आणि इंग्लंडने न्यूझीलंडला नमवलं होतं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी किवींनी त्या पराभवाचं उट्टं काढलं. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकांत नऊ गडी गमावून 282 धावा केल्या. न्यूझीलंडने 36.2 षटकात 1 विकेट गमावत 283 धावा करत सामना जिंकला.