राहुरीत टिपू सुलतानचा फोटो स्टेटसला ठेवणाऱ्या दोघांवर गुन्हा

टिपू सुलतानचा फोटो व्हॉट्सऍप व इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर ठेवून समाजात द्वेष पसरविणाऱया दोघांवर राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक केली आहे. आज (मंगळवारी) देवळाली प्रवरा येथे ही घटना उघडकीस आली.

इम्रान रज्जाक शेख आणि शाहरुख रहिमतुल्ला शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. इम्रान शेख याने त्याच्या व्हॉट्सऍपच्या स्टेटसला टिपू सुलतानचा फोटो आणि व्हिडीओ ठेवून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरा आरोपी शाहरूख शेख याने त्याच्या इन्स्टाग्रामवर टिपू सुलतानचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे मनीष शेटे यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून इम्रान शेख व शाहरुख शेख या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार आहेर करीत आहेत.

औरंग्याचे फोटो स्टेटसला ठेवणाऱ्यावर गुन्हा

औरंगजेबाचा फोटो खांद्यावर घेऊन नाचणाऱया मुलांचा फोटो व्हॉट्सऍपच्या स्टेटसला ठेवल्याप्रकरणी एकाला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. अलबश्क शेख (रा. सात्रळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कन्हैया दिघे (रा. धानोरे) यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अलबश्क शेख याने त्याच्या व्हॉट्सऍपच्या स्टेटसला औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचणाऱया मुलांचा फोटो ठेवला होता. त्यामुळे त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.