दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत सादर

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी हे विधेयक सदनात मांडले. काँग्रेस पक्षाचे अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकाचा विरोध केला आहे. बिजू जनता दलाने मात्र या विधेयकाला समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते आहे. बिजेडीने भाजपला या विधेयकासाठी समर्थन दिल्याने दोन्ही सदनात भाजपचे संख्याबळ वाढले आहे.