संचित – साहित्य-जयवंत

>> दिलीप जोशी

पु. ल. देशपांडे नावाच्या प्रतिभावंताने मराठी विनोदाचे अवकाश व्यापलेले असतानाच्या काळातच जयवंत दळवी आपल्या मिश्कील शैलीने बहारदार लेखन करत होते. चेहऱयावर गांभीर्य आणि लेखणीमध्ये मिश्कीलपणा असणाऱया दळवींची गेल्या 16 तारखेला पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने सारं आठवलं…

एकेकाळी दूरदर्शनवर ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या कार्पामातून अनेक प्रसिद्ध व्यक्ती ‘घरी’ आल्याचा अनुभव रसिक प्रेक्षकांना मिळाला होता. मुलाखतीच्या या कार्पामात दिग्गजांची कहाणी त्यांच्याकडूनच समजायची. काही वेळा प्रमुख पाहुणे आणि संवाद साधणारे दोन्ही प्रसिद्ध व्यक्ती असत. विख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांची मुलाखत मराठीतले आणखी एक विनोदकार जयवंत दळवी घेत होते. पुलं त्यांच्या शैलीत चौकार-षटकार मारत असल्याने मुलाखत रंगत होती. दळवी शांतपणातून मिष्किलपणा व्यक्त करत प्रश्न विचारत होते. एक प्रश्न होता, “भाई तुमचं बोलणं काही वेळा पाल्हाळिक होतं का?” प्रश्न विचारून दळवींनी मख्खपणाचा अभिनय करत पुलंकडे पाहिलं आणि पुलं उत्तरले, “जयवंत, ते खरंही असेल, पण आपण मोठय़ा माणसांना असं विचारू नये!”… आणि घराघरांत हास्यकल्लोळ झाला.
पु. ल. देशपांडे नावाच्या प्रतिभावंताने मराठी विनोदाचे अवकाश व्यापलेले असतानाच्या काळातच जयवंत दळवी आपल्या मिश्कील शैलीने बहारदार लेखन करत होते. ‘ललित’ मासिकातलं त्यांचं ‘ठणठणपाळ’ म्हणून केलेलं ‘घटिका गेली पळे गेली’ हे सदर साहित्यविश्वातील अनेकांची खिल्ली उडवत होतं आणि ते आवडणारा बराच मोठा वाचकवर्ग त्याची चर्चा करत होता. त्यातून पुलंसारखे काही विनोद टो}वणारे होते, तर काही जण दळवींवर चिडलेलेही होते. बरं, दळवी हे सदर लिहितात याची कल्पना नसलेले त्यांच्याकडेच पार करत. कारण ‘थंड’ वाटणाऱया चेहऱयाने वावरणारे, पण टपोऱया डोळय़ांत मिश्की}ाr भरलेले दळवी शांतपणे सारं ऐकून घेत.

त्यांची भेट झाली ती त्यांच्या ‘युसिस’ किंवा अमेरिकन कल्चरल सेंटरच्या चर्चगेट इथल्या आाफिसात. तिथे तीन मराठी साहित्यिक काम करायचे. रमेश मंत्री, मंगेश पाडगावकर आणि जयवंत दळवी. यांपैकी मंत्री आमच्या ‘श्री’च्या दिवाळी अंकात काही वेळा लिहायचे. दळवी आमच्याकडे एक कादंबरीच क्रमश: लिहीत होते. त्या काळात पु. भा. भावे यांचीही एक कादंबरी ‘श्री’मध्ये क्रमश: आली होती… काही वेळा दळवींकडून त्या आठवडय़ाचा मजकूर आणण्यासाठी मुद्दाम जायचो. तिथे या तिन्ही प्रसिद्ध व्यक्तींशी गप्पा व्हायच्या. पाडगावकर भरपूर बोलायचे. “एम. ए. करून अशी काहीतरी नोकरी कर,” असंही ते एकदा म्हणाल्याचं आठवतं. दळवी मात्र जेवढय़ास तेवढं बोलायचे. गप्पांचा फड स्वत: रंगवण्यापेक्षा इतरांना मार्मिक प्रश्नांनी बोलतं करण्यात मात्र त्यांचा हातखंडा होता. ‘ललित’तर्फे दिला जाणारा मराठी वाङ्मयाचा पहिला ‘नोबेल’ सन्मान देण्यासाठी ते आचार्य अत्रे यांच्याकडे गेले असताना, अत्रे आत्रेय शैलीत धो धो बोलत होते. त्यांची विस्तृत मुलाखत घ्यावी असं दळवींच्या मनात आलं पण नंतर अत्रे आजारी पडले व ती गोष्ट मनातच राहिली. पुढे काही काळाने त्यांनी लोककवी मनमोहन नातू, राजकवी यशवंत, कवी बा. भ. बोरकर, लेखक वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, ग. त्र्यं. माडखोलकर अशा त्या काळात गाजत असलेल्या साहित्यिकांच्या मुलाखती घेतल्या. त्याचं पुढे पुस्तकही निघालं. त्या संवादाच्या वेळी दळवींनी मोजक्या मिश्कील शब्दांत या सर्वांचा ‘परिचय’ करून देताना त्यांची व्यक्तिचित्रे साकारली आहेत. दळवींनी दूरदर्शनवरच बाळासाहेब ठाकरे यांचीही मुलाखत घेतल्याचं आठवतं.

नंतर एकदा दळवी ‘श्री’ आाफिसमध्ये आले असताना बोलायला वेळ होता आणि ड्रावरमध्ये मापो-रेकार्डरही होता. फारसे न बोलणाऱया दळवींना सोपारकरांनी बोलतं केलं होतं. त्यांच्या विनोदी लेखनाबरोबरच त्यांच्या ‘महानंदा’, ‘पा’ अशा गंभीर विषयांवरच्या कादंबऱया, ‘संध्याछाया’, ‘पुरुष’सारखी नाटकं असे अनेक विषय बोलण्यात आले. ‘पा’ वाचून हबकलेल्या पां. वा. गाडगीळ यांची “अरे कसलं भयंकर लिहिलंयस तू…” अशी प्रतिक्रिया आणि त्यांचे किस्से सांगताना दळवींना माफक हसू येत होतं. एरवी आव बहुधा उसन्या, पण सहज गांभीर्याचा. आाफिसच्या गडबडीत आणि रस्त्यावरच्या मोटारींच्या आवाजात ते सारं ध्वनिमुद्रण नीट ऐकू न येण्यासारखं झालं आणि ड्रावरमधली ती इवलीशी मापो पासेटही गहाळ झाली. नंतर याचं खूप वाईट वाटलं. एकदा तर ‘श्री’तर्फेच त्यांच्या मुलाखतीचा कार्पाम करावा असं आम्ही ठरवत होतो तेही या ना त्या कारणाने राहिलं.

दळवींनी लेखनासाठी नोकरी सोडली. आम्हीही काहीजणांनी ‘फ्रि-लान्स’ करण्याचा निर्णय घेतला आणि या अल्पकाळाच्या भेटीगाठी थांबल्या. दरम्यान, दळवींची वाढती किर्ती सर्वत्र पसरत होती. पुलं आणि सुनीताबाईंना त्यांचं विशेष कौतुक होतं. दळवी शेवटी आजारी असतानाच बोरिवलीला त्यांचा जो सत्कार समारंभ पुलं आणि सुनीताबाईंच्या उपस्थितीत झाला त्याला त्यांचे साहित्यिक मित्र व रसिक श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कधीही ‘व्याख्यान’ न देणारे दळवी त्या दिवशी भरभरून बोलले. गप्पाष्टकाची आम्ही अनुभवलेली शैली रसिकांना आवडली. वाक्यावाक्याला मिळत असलेली दाद पाहून दळवीही खुशावले. मला आठवतं ते असं अरुण आठल्ये यांनी या कार्पामाच्या आयोजनात सर्वांचं स्वागत करून दळवींसाठीचं ‘मानपत्र’ वाचून दाखवलं होतं. सत्तरीच्या कार्पामात श्रोत्यांची मनं जिंकणाऱया दळवींचं (क्वचितच होणारं) ते भाषण अखेरचं ठरलं. अवघ्या पंधरवडय़ात दळवी गेले आणि विलक्षण धक्का बसला. मागे उरलं ते त्यांचं विपुल वाङ्मय आणि काही आठवणी. ध्वनीमुद्रण बिघडलं याची मात्र खंत वाटत राहिली. गेल्या 16 तारखेला दळवींची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने सारं आठवलं.

[email protected]