एक दुआ – लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

नुकतीच केंद्र सरकारच्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात अनेक मराठी व हिंदी चित्रपट, लघुपट, माहितीपटांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या एक दुआ या लघुपटाला स्पेशल ज्युरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ईशा देओलची पहिली निर्मिती असलेल्या लघुपटात मुख्य भूमिकादेखील ईशा देओलनेच साकारली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन राम कमल मुखर्जी यांनी केले आहे. नॉन फिचर विभागातील विशेष उल्लेखनीय लघुपट म्हणून या शॉर्टफिल्मला पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्त्र्ााrभ्रूणहत्या हा अत्यंत संवेदनशील व सामाजिक आशय असलेला विषय या लघुपटातून मांडण्यात आला आहे.

इतका मानाचा व प्रतिष्ठsचा पुरस्कार प्राप्त झाल्याने आनंद होत आहे. सामाजिक विषयावरील चित्रपट वा लघुपट साकारणं हे जबाबदारीचे काम असते. स्त्र्ायांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा याच उद्देशाने असे विषय मांडले जातात. त्यामुळेच अशा स्वरूपाचा राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचा पुरस्कार प्राप्त होणे म्हणजे या विषयाची दखल घेण्यासारखे आहे, अशा शब्दांत राम कमल मुखर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

सध्या राम कमल मुखर्जी त्यांच्या बिनोदिनीएकटी नातीर उपाख्यान या थिएटर लिजेंड बिनोदिनी दासी यांच्यावर आधारीत बंगाली बायोपिक आणि द्रौपदी या बिग बजेट चित्रपटांच्या कामात व्यस्त आहेत.