ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोने मान टाकली! एक्सर-मंडपेश्वरदरम्यान तांत्रिक बिघाड, अर्धा तास वाहतूक ठप्प

मध्य आणि पश्चिम रेल्वेनंतर आज गर्दीच्या वेळी मेट्रोनेही मान टाकली. सकाळी चाकरमानी कार्यालयात जाण्यासाठी धावपळ करत असतानाच मेट्रे 2-अ आणि 7 मार्गावरील एक्सर-मंडपेश्वर स्थानकांदरम्यान सकाळी साडेआठच्या सुमारास मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे जवळपास अर्धा-पाऊण तास मेट्रो सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तसेच अनेकांनी मेट्रो ट्रकमधून चालत जात कार्यालय गाठले.

अंधेरी पश्चिम ते गुंदवली या सुमारे 18 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावर दररोज अडीच-तीन लाख प्रवासी ये-जा करतात. लोकल ट्रेन, बसऐवजी मेट्रोने गारेगार प्रवास करण्याला अनेक प्रवासी प्रवास करण्यास पसंती देत आहेत. त्यानुसार सकाळी मेट्रोने कार्यालयात जाण्यासाठी चाकरमानी निघाले असतानाच एक्सर स्थानक येथे तांत्रिक बिघाड होऊन मेट्रोची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे जवळपास अर्धा-पाऊण मेट्रो वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अनेक गाडय़ांमध्ये आणि स्थानकांमध्ये प्रवासी अडकून पडले. मेट्रो सेवा कधी सुरळीत होणार याबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याने प्रवाशांनी ट्रकमधून चालत कार्यालय गाठले. त्यामुळे मेट्रो ट्रॅकला रस्त्याचे रूपडे आले होते.

केोी

मेट्रो ट्रेनमधील तांत्रिक बिघाडामुळे गाडी ट्रकमध्येच अडकून पडल्याने अनेक मेट्रो गाडय़ा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे एकही मेट्रो गाडी रद्द करण्यात आली नसल्याचा दावा मेट्रो प्रशासनाने केला आहे.