रणदीप सुरजेवाला यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सूरजेवाला यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र सूरजेवाला यांच्या प्रचाराला 48 तास बंद करण्याचा आदेश दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. सूरजेवाला यांनी भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याविषयी केलेल्या विधानावर आक्षेप घेत भाजपने आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

त्या तक्रारीवरून सूरजेवाला यांना पुढील 48 तासांसाठी निवडणुकीसाठी प्रचार करणे आणि कोणत्याही प्रकारच्या माध्यमावर मुलाखती देणे यांवर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ज्या व्हिडीओवरून भाजपने तक्रार दाखल केली होती, त्या व्हिडीओशी छेडछाड झाल्याचं सूरजेवाला यांचं म्हणणं होतं. त्यानंतर आयोगाने ही कारवाई केली आहे.