हिमालय ब्रिजवर आता सरकते जिने.पालिकेकडून वेगाने काम सुरू

पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय ब्रिजवर आता सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेकडून वेगाने काम सुरू आहे. यामुळे ज्येष्ठ, लहान मुले, गरोदर स्त्रिया, दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेला होता. तर 32 जण गंभीर जखमीही झाले होते. या दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पूल, उड्डाणपूल, रेल्वे आणि पादचारी पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम वेगाने हाती घेतले आहे. यामध्ये हिमालय पूल 35 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद, स्टेनलेस स्टीलच्या सहाय्याने बांधण्यात आला आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या या पुलासाठी सात कोटींचा खर्च करण्यात आला आहे. चार वर्षांनी हा नवा पूल बांधून एप्रिलपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र या ठिकाणी सरकते जिने नसल्याने अनेक वेळा पुलाखालून प्रकाशांचे जीवघेणे क्रॉसिंग सुरू होते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान, आता सरकते जिने उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्यावर छप्पर उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर सरकते जिने सुरू करण्यात येणार आहेत.

असा आहे मजबूत पूल

हा पूल स्टेनलेस स्टीलपासून बांधण्यात आला आहे. यामुळे खाऱ्या हकेचा परिणाम होणार नसून गंजण्याचा धोकाही टळणार असून पुलाची मजबुतीही काढणार आहे. ग्रॅनाइट पृष्ठभागामुळे चालण्यासाठी सोयीस्कर मार्ग आहे. गर्दीच्या वेळी या पुलावरून सुमारे 18 हजार पादचारी जाऊ शकतील इतकी पुलाची क्षमता आहे.