दिल्ली मेट्रोत बसण्याच्या जागेवरुन महिलांचा तुफान राडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

दिल्ली मेट्रोतील विचित्र घटनांमुळे ती कायम चर्चेत असते. आता दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही महिला एकमेकींना बेकार मारहाण करत असल्याचे दिसत आहे. ज्यावेळी मेट्रोच्या आत ही हाणामारी सुरु होतीस त्यावेळी अनेक प्रवाश्यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्नही केल्याचे दिसत आहे.

‘घर के क्लेश’ नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यावर लिहीले आहे की, दिल्ली मेट्रोमध्ये मुली आणि महिलांचा एक ग्रुप सीट मिळण्यावरुन भांडताना दिसत आहे. मीडिया वृत्तानुसार, महिलांमध्ये हे भांडण मेट्रोतील सीट वरुन झाले होते. त्यानंतर ते मारहाणीपर्यंत पोहोचले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मला हे सर्व का पाहायला मिळत नाही. शंकर रॅका नावाच्या युजरने लिहिले की, बिग बॉसपेक्षा दिल्ली मेट्रो अधिक मनोरंजन करते.” यावर उत्तर देताना अन्य एका युजरने लिहिले की, ‘मला दिल्ली मेट्रो आवडते. कार विकून मेट्रोने प्रवास करण्याची माझी योजना आहे. तर अन्य एका युजरने लिहिले की, दिल्ली मेट्रो ही जगातील सर्वाधिक घटना घडणारी जागा आहे. दुसर्‍या एका यूजरने लिहिले की, ‘जेव्हाही मी मेट्रोने प्रवास करतो तेव्हा मला वाटतं की आज काहीतरी लाइव्ह दिसूदे.

दिल्ली मेट्रोतील अशाप्रकारे व्हायरल होणारा हा पहिलाच व्हिडीओ नाही. या आधीही दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आधी बिकीनी घालून मेट्रो गर्ल, नंतर मेट्रोत आंघोळ करणारा तरुण, अश्लील नृत्य करणारी तरुणी, नंतर हस्तमैथुन करणारा तरुण..मेट्रोत बसून एकमेकांचे चुंबन घेणारे युगुल असे दिल्ली मेट्रोतील वेगवेगळे व्हिडीओ चर्चेचा विषय बनले आहेत.