IPL 2024 – गुजरात टायटन्सची हैदराबादला धडक; घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय                        

 

 

गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी आणि 5 चेंडू राखून पराभव करीत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय मिळविला. मोहित शर्माची तिखट गोलंदाजी आणि त्यानंतर सांघिक फलंदाजीच्या जोरावर गुजरातने हा विजय मिळविला. 25 धावांत 3 बळी टिपणारा मोहित शर्मा या सामन्याचा मानकरी ठरला.

सनरायझर्स हैदराबादला 162 धावांवर रोखल्यानंतरही गुजरात टायटन्सला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत वाट बघावी लागली. शेवटी 19.1 षटकांत 3 बाद 168 धावा करीत गुजरातने विजयाला गवसणी घातली. वृद्धिमान साहा (25) व कर्णधार शुभमन गिल (36) यांनी 4.1 षटकांत 36 धावांची सलामी दिली. यात 25 धावांचे योगदान देणाऱया साहाने 13 चेंडूंत 2 षटकारांसह एक चेंडू सीमापार पाठविला. शाहबाझ अहमदने साहाला कमिन्सकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. 28 चेंडूंत 2 चौकारांसह एक षटकार ठोकणारा गिल दहाव्या षटकात बाद झाला. त्याला मयंक मार्पंडेने अब्दुल समदकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर साई सुदर्शन (45) व डेव्हिड मिलर (नाबाद 44) यांनी तिसऱया विकेटसाठी 42 चेंडूंत 64 धावांची भागीदारी केली. पॅट कमिन्सने सुदर्शनला अभिषेक शर्माकरवी झेलबाद करून ही भागीदारी तोडली. सुदर्शनने 36 चेंडूंत 4 चौकारांसह एक षटकार लगावला. त्यानंतर डेव्हिड मिलरने विजय शंकरला हाताशी धरून गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी, नाणेफेकीचा काwल जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 8 बाद 162 अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ट्रव्हिस हेड (19) व मयंक अगरवाल (16) या सलामीच्या जोडीसह अभिषेक शर्मा (29), एडेन मार्करम (17), हेन्रिच क्लासेन (24), शाहबाझ अहमद (22) व अब्दुल समद (29) या मधल्या फळीतील फलंदाजांनीही छोटेखानीच खेळय़ा केल्या. मोहित शर्माने महत्त्वाचे तीन बळी टिपत हैदराबादच्या धावगतीला चाप लावला.