अमेरिकन अध्यक्ष पदासाठी 3 हिंदुस्थानी चेहरे

पुढील वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातून एरोस्पेस अभियंता हर्षवर्धन सिंग, विवेक रामास्वामी, पॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली हे तीन हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन नागरिक इच्छुक आहेत. अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह एकूण 14 उमेदवार पक्षाकडे अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवारी मागत आहेत.