Salman Khan House Firing Case – सलमानसह अन्य 2 अभिनेत्यांच्या घराचीही केली होती रेकी; आरोपींचा धक्कादायक खुलासा

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक केलेला आरोपी रफीक चौधरीने मोठा खुलासा केला आहे. केवळ सलमान खानच नव्हे तर त्याच्यासोबत अन्य दोन अभिनेत्यांच्या घराचीही रेकी केली असल्याचा खुलासा केला. या वक्तव्यावरुन मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे.

आरोपी रफीक चौधरी यांना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी राजस्थान येथून अटक केली होती. त्यानेच मुख्य आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींना घरावर फायरिंग करण्यासाठी पैसे दिले होते. राजस्थान येथून अटक करुन त्यांना मुंबईत आणले होते. जिथे त्यांना न्यायालयात उभे केले होते. याप्रकरणी पोलीसांनी लागोपाठ तपास करत जवळपास 5 जणांना अटक केली आहे. सलमान खानच्या घरावर 14 एप्रिलला सकाळी अचानक गोळीबार करण्यात आला. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने सागर आणि विक्कीला पहिले अटक करण्यात आले होते. या प्रकरणाची जबाबदारी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली होती. पोलिसांनी दोन्ही भांवांना वॉण्टेड आरोपी म्हणून घोषित केले आहे.

सलमान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आधी सागर आणि विक्कीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनुज थापन आणि सोनू या आरोपींना अटक करण्यात आली. सागर आणि विक्कीविरोधात कुठलंही क्रिमिनल रेकॉर्ड समोर आले नव्हते. मात्र अनुज आणि सोनूविरोधात पंजाब आणि हरियाणा मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. दोघांच्या हिस्ट्रीमध्ये लॉरेन्स बिश्नोईसोबतचे कॉन्टॅक्ट समोर आला आहेत. यापैकी पोलीस तुरुंगात राहिल्यानंतर एका आरोपीने आत्महत्या केली. अटक झालेल्या चार आरोपांपैकी अनुज थापन आता जिवंत नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी तुरुंगात आत्महत्या केली, त्याला रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. अनुज थापन असे मृत आरोपीचे नाव आहे,