IND Vs ENG Test : हिंदुस्थानचा ऐतिहासिक विजय, इंग्लंडचा 434 धावांनी धुव्वा

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यामध्ये राजकोट येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानने इंग्लंडला 434 धावांनी पराभवाची धूळ चारत इतिहास रचला आहे. या विजयासह 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली.

टीम इंडियाने आपला दुसरा डाव 126 धावांची आघाडी घेत 430 धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडपुढे जिंकण्यासाठी 557 धावांचे लक्ष्य होते. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 122 धावांवर तंबूत परतला. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्य्या संघांचा निभाव लागला नाही. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मार्क वुड या एकमेव फलंदाजाने सर्वाधिक 33 धावा केल्या.

हिंदुस्थानच्या रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 गडी बाद केले तर कुलदीप यादवने 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन दोघांनी 1-1 गडी बाद केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांचा विचार केला तर हिंदुस्थानचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी हिंदुस्थाने 2021 मध्ये सर्वात मोठा विजय साजरा केला होता. हिंदुस्थाने न्यूझीलंडचा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर 372 धावांनी पराभव केला होता.