‘इंडिया’चे शिष्टमंडळ आज मणिपुरात; शिवसेनेकडून अरविंद सावंत, राष्ट्रवादीकडून फैजल जाणार 

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपुरात आगडोंब सुरू आहे. दोन महिलांची नग्न धिंड काढून सामूहिक बलात्काराची भयंकर घटना उघडकीस आल्यानंतर जगभरात देशाची छीथू झाली. यावर संसदेत विरोधी पक्षांकडून आठ दिवसांपासून रणकंदन सुरू आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी मौनी बाबा बनलेत. मणिपुरातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी, हिंसाचारग्रस्त भागाला भेट देऊन तेथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी इंडियाच्या 20 खासदारांचे शिष्टमंडळ उद्या (दि. 29) पासून दोन दिवस मणिपूर दौऱयावर जात आहे. 

खासदारांच्या या शिष्टमंडळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत, काँग्रेसचे अधिर रंजन चौधरी, गौरव गोगोई, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहमद फैजल, तृणमूल काँग्रेसच्या सुषमिता देव आदींचा समावेश आहे.