भाजप नेत्याचा अपक्ष लढण्याचा निर्णय; पक्ष नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

Lok Sabha Election 2024: चे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. तिकीट न मिळाल्यास बंडखोरीची तयारी देखील अनेकांनी केली आहे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते केएस ईश्वरप्पा बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट न मिळाल्यानं रिकाम्या हाती परतले. कर्नाटक राज्य नेतृत्वाविरुद्ध बंड केलेले ईश्वरप्पा शिवमोग्गा येथे परतले असून त्यांनी आता अपक्ष म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला आहे.

ईश्वरप्पा यांनी पुनरुच्चार केला की आपण पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शिवमोग्गामध्ये माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार बी वाय राघवेंद्र यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे.

ते म्हणाले, ‘आणखी चर्चा नको आणि आपला लढा शेवटापर्यंत नेण्यासाठी शिवमोग्गा येथून निवडणूक लढणार आहे’.

एक अट ठेवताना ते म्हणाले, प्रदेश भाजप अध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांना अध्यक्षपदावरून हटवले पाहिजे, तरच ते शिवमोग्गामधून लढण्याचा निर्णय मागे घेण्यास ते तयार होतील.

बीएस येडियुरप्पा आणि कुटुंबावर हल्ला करताना ‘राज्य भाजपचे नेतृत्त्व असलेल्या एका कुटुंबाने हिंदू कार्यकर्ता आणि भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत’, असा आरोप केला आहे.

याआधी, अमित शहा यांच्याशी भेट घेण्यापूर्वी, ईश्वरप्पा यांनी स्पष्ट केलं होतं की निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय. विजयेंद्र यांची बदली झाल्याशिवाय ते निवडणूक लढविण्याचा निर्णय बदलणार नाहीत.

ईश्वरप्पा म्हणाले की, त्यांचा लढा राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाविरुद्ध आहे.