लालबागमधून 17 फूट बाप्पा निघाला टोरॅण्टोला

कला, संस्कृतीचा वारसा जोपासणाऱ्या लालबागमधील आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठानच्या गणसंकुलामधून नुकतीच अत्यंत सुबक आणि आकर्षक अशी 17 फुटी गणेशमूर्ती कॅनडातील टोरॅण्टोला सागरी मार्गाने रवाना झाली. मूर्तिकार निखिल खातू यांनी ही गणेशमूर्ती घडवली आहे. गणेशमूर्ती कॅनडा येथे जाण्यापूर्वी शिवसेनेचे गटनेते, आमदार अजय चौधरी, गणसंकुलाचे संस्थापक पराग चव्हाण यांनी गणेशाचे दर्शन घेतले. गणसंकुलातून तयार झालेल्या आकर्षक गणेशमूर्तींना देशाबरोबरच परदेशात स्थायिक झालेल्या भाविकांकडूनही मागणी आहे.