चीनच्या शहरांना भूस्खलनाचा धोका वाढला

चीनमधील जवळपास अर्ध्या शहरांना पाण्याची समस्या आणि शहरातील इमारतींना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. नव्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात बीजिंग आणि तियानजिनसह चीनचे प्रमुख शहर हे भूस्खलनाचा सामना करत आहेत. चीनची 45 टक्के शहरातील जमीन प्रति वर्ष 3 मिलीमीटरहून जास्त खाली जात आहे, तर 16 टक्के प्रति वर्ष 10 मिलीमीटरहून अधिक बुडली जात आहे. संशोधनासाठी वैज्ञानिकांनी 2015 ते 2022 दरम्यान 2 मिलियनहून अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरातील जमिनीचे मोजमाप घेतले. ज्यात 82 शहरांची तपासणी केली. सहापैकी एक शहर प्रति वर्ष 10 मिमी हून अधिक वेगाने खाली जात आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर शांघाय गेल्या दशकात 3 मीटरपर्यंत बुडाले आहे, तर बीजिंगमधील सबवे आणि राजमार्गांजवळील जमीन वार्षिक 45 मिलीमीटर बुडत आहे.