महाराष्ट्राची लोकप्रिय कला जपण्यासाठी ‘सन मराठी’ वाहिनी घेऊन येते नवीन कार्यक्रम ‘लावणी महाराष्ट्राची’

आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख लोकनृत्य म्हणजे ‘लावणी’. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. लावणी नृत्य सादर करणं किंवा ते शिकणं ही पण एक कलाच आहे. लावणीच्या कार्यक्रमांना अजूनही तितकाच उदंड प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळतोय. लावणी हे नृत्य दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे.

आपल्या महाराष्ट्राची कला जपणं हे प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकांचं कर्तव्य आहे असं म्हणायला सुध्दा हरकत नसेल. लावणी ही लोककला जपण्यासाठी ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी वाहिनीने देखील पुढाकार घेतला आहे. “ढोलकीची थाप आणि तुणतुण्यासोबत झंकारणार घुंगराचे चाळ…” असं म्हणत ‘सन मराठी’ वाहिनी पुन्हा एकदा जिवंत करणार महाराष्ट्राच्या लावणीचा सुवर्णकाळ. ‘लावणी महाराष्ट्राची’ हा नवीन मनोरंजक कार्यक्रम येत्या 25 फेब्रुवारीपासून दर रविवारी रात्री 9 वाजता सन मराठीवर सुरु होणार आहे.