प्रथिनांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ शाकाहारी पदार्थांचा समावेश

शरीराला प्रथिनांची आवश्यकता असते. शरीराच्या विकासासाठी प्रथिनांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. मांसाहार केल्याने प्रथिने मिळतात, असे नाही तर काही शाकाहारी पदार्थांतही प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी शाकाहारी पदार्थ खाऊ शकता. त्यामुळे शरीराला भरपूर प्रथिने मिळतील.

ग्रीक योगर्ट
ग्रीक योगर्ट हा दह्याचाच प्रकार आहे.यामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. जी ग्रीक योगर्टद्वारे सहज उपलब्ध होतात.साध्या दह्याऐवजी या दह्याचा आहारात समावेश करू शकता.चव वाढवण्यासाठी त्यात मीठ, अक्रोड, मध मिसळून खा.

दूध
दुधात फक्त कॅल्शियमच नाही, तर प्रथिने भरपूर असतात.दूध हा उच्च दर्जाच्या प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे.दुधामुळे पोट भरलेले राहते.

सुकामेवा
अक्रोड, बदाम, पिस्ता यासारखा सुकामेवा खाणे सर्वोत्तम मानले जाते. वजनवाढीवर नियंत्रण आणि ह्रदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारात सुका मेव्याचा समावेश करावा. कॅलरीज जास्त असल्यामुळे सुकामेव्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

डाळी
डाळींमध्ये प्रथिनेच नाही, तर फायबर, फोलेट,मॅंगनीज,लोह, फॉस्फरस,पोटॅशियम आणि ब जीवनसत्त्व यांसारखी पोषक तत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.डाळींमधील प्रथिने हृदयाचे आरोग्य राखण्यास, पचनास मदत करतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासही फायदेशीर ठरतात.

बटाटा
बटाटा प्रथिने आणि इतर पोषक तत्त्वांचा समृद्ध स्रोत आहे.एका बटाट्यात प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स सारखी अनेक पोषक तत्त्वे असतात,मात्र कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्यामुळे बटाटा मर्यादित प्रमाणात खावा.